सिंधुदुर्ग-रत्नागिरी मधील मतदारसंघामध्ये विद्यमान विरुद्ध नवा चेहरा, निष्ठा विरुद्ध गद्दारी या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली होती, त्यामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मधील ८ जागांवर कोण येतंय? कोकणातील या ८ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार त्यांचा गड अभेद्य ठेवणार कि नवे शिलेदार विद्यमानांना दणका देणार ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून…
१.पहिला मतदारसंघ आहे कुडाळ. कुडाळ मध्ये निलेश राणे त्यांच्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र सद्यपरिस्थितीत ठाकरेंसोबत ठेवलेली निष्ठा, स्थानिक राजकारणावर असलेली पकड आणि जनसंपर्क यांच्यामुळे वैभव नाईक यांचं पारडं जड असल्याचं पहायला मिळत आहे.
२.दुसरा मतदारसंघ आहे कणकवली. कणकवली विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, भाजपकडून निवडणूक लढणारे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेले आमदार नितेश राणे तसेच उद्धवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्यातच खऱ्या अर्थाने ‘काँटे की टक्कर’ झाली. ज्यात संदेश पारकर यांचे चान्सेस जास्त दिसतात.
३.तिसरा मतदारसंघ आहे सावंतवाडी. सावंतवाडीत महायुती कडून येथे विद्यमान आमदार दीपक केसरकर, महाविकास आघाडीकडून राजन तेली मैदानात आहेत तर माविआ च्या अर्चना परब-घारे व भाजप कडून विशाल परब यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या येथील विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून राजन तेली यांचे चान्सेस जास्त आहेत.
४. चौथा मतदारसंघ आहे दापोली. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम यांच्यामध्ये मित्रपक्षांकडून मिळणाऱ्या मदतीचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम यांना झुकत माप मिळतंय.
५. पाचवा मतदारसंघ आहे गुहागर. गुहागर मतदार संघामध्ये उद्धव सेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधव व शिंदे सेनेचे राजेश बेंडल यांच्यामध्ये अनुभव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ, व मित्र पक्षांची मदत यांच्यामुळे भास्कर जाधव पुन्हा एकदा बाजी मारणार अस दिसतंय.
६. सहावा मतदारसंघ आहे रत्नागिरी. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत तर शिवसेना ठाकरे गटाकडून बाळ माने यांच्या मध्ये बालेकिल्ल्यामधली लढत, मतदारसंघावर असणारा होल्ड, तगडा जनसंपर्क या सगळ्याचा फायदा उदय सामंत यांना होणार असल्याने ते त्यांचा गड अभेद्य ठेवतील असं दिसतंय.
७. सातवा मतदारसंघ आहे राजापूर.कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील लढाई महत्वपूर्ण ठरणार आहे. सलग तीन वेळा विजयी झालेल्या , ठाकरेंच्या राजन साळवींसमोर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं आव्हान आहे. ज्यातील राजन साळवी जनसंपर्क, जनतेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी असलेली सहानुभूती, आणि मतदारसंघावरचा होल्ड यामुळे ते विजयी चौकार मारणार असं दिसतंय.
८. आठवा मतदारसंघ आहे चिपळूण. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक निष्ठाविरुद्ध गद्दारी अशी लढवली गेली. चिपळूण संगमेश्वर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून प्रशांत यादव यांच्यात निष्ठाविरुद्ध गद्दारी अशी निवडणूक होत आहे. ज्यात या मतदारसंघातील मतदार निष्ठेच्या बाजूने उभे राहणार असे चित्र आहे ज्याचा फायदा प्रशांत यादव यांना मिळेल.
तर तुम्हाला काय वाटतं ? निष्ठा विरुद्ध गद्दारी या मुद्द्यावर लढवल्या गेलेल्या या मतदारसंघांमध्ये कोण येणार? कोकणातील या ८ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार त्यांचा गड अभेद्य ठेवणार कि नवे शिलेदार विद्यमानांना दणका देणार? यावर तुम्हाला काय वाटत ते कंमेंट करून नक्की सांगा…