निवडणुका लढण्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा! असं म्हटलं जातं, शिवाय निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला असा आरोप देखील होत आहे आणि हे का बोलल जातंय याची प्रचिती सध्या येतीये. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार महाराष्ट्रातील 97 टक्के आमदार हे करोडपती आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील 288 पैकी तब्बल २७७ आमदार हे करोडपती आहेत. ज्यावरून महाराष्ट्रातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आमदार सोडले तर सर्व आमदारांकडे खोक्यांनी नाहींनाही करोडोंनी संपत्ती आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोण आणि त्यांच्याकडे किती कोटींची संपत्ती आहे तर पाहूयात
भारतातील सर्वात श्रीमंत महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत पराग शहा. भाजपाचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा यांच्याकडे तब्बल 3383 कोटी रुपयांची संपत्ती आहे व या सोबतच ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार देखील आहेत. + 34999 मतांच्या मताधिक्याने पराग शहा हे घाटकोपर पूर्व मधून निवडून आले आहेत.
दुसरे आमदार आहेत प्रशांत ठाकूर. भाजपचे पनवेल मधील आमदार प्रशांत ठाकूर यांची संपत्ती तब्बल 475 कोटी रुपयांची आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 51091 मतांनी प्रशांत ठाकूर हे पनवेल मतदारसंघातून निवडून आले आहेत.
तिसरे आमदार आहेत मंगल प्रभात लोढा. मुंबईमधील मलबार हिल मतदार संघातून निवडून आलेले मंगल प्रभात लोढा यांच्याकडे तब्बल 447 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे..
सर्वात श्रीमंत चौथे आमदार आहेत प्रताप सरनाईक शिवसेना शिंदे गटाचे ओवळा मजीवाडा मतदार संघातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तब्बल 333 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
महाराष्ट्रातील पाचवे सर्वात श्रीमंत आमदार आहेत समाजवादी पार्टीचे अबू आझमी. मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून विजयी झालेल्या अबू आझमी यांच्याकडे तब्बल 309 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
यासोबतच काँग्रेसचे पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे 299 कोटींची संपत्ती आहे,
भाजपचे समीर मेघे यांच्याकडे 261 कोटींची संपत्ती आहे तर
शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्याकडे 235 कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि ही यादी अशीच वाढत जाते.
तर वरील माहिती या सर्व आमदारांनी निवडणुकीच्या वेळेस निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रातून घेण्यात आली आहे. एकीकडे श्रीमंत महाराष्ट्राचे आमदार श्रीमंत होत आहेत
तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जनता मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील संघर्ष करत आहे. तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला …