अतरंगी वक्तव्य करून इन्स्टा-फेसबुक वर व्हिडिओ टाकत बटुळे बाबा नेहमीच चर्चेत असतात. तर त्यांचे यातील काही व्हिडिओज वायरल देखील होतात. मराठवाड्यातील कुठलाही मुद्दा असेल त्यावर बटुळे बाबा त्यांची प्रतिक्रिया देणार हे निश्चित! खास करून जर मुद्दा बीड, जालना इथला असेल किंवा मनोज जरांगे पाटील व मुंडे कुटुंबीयांशी संबंधित असेल. म्हणूनच हे बटुळे बाबा नेमके कोण आहेत? तेच पाहुयात
आपल्या इन्स्टा फेसबुकवरच्या अकाउंट वरून बटुळे बाबा हे व्हिडिओज पोस्ट करत त्यांचे म्हणणे मांडत असतात. बटुळे बाबा हे ओबीसी समाजातून येतात, ते ओबीसी समाजाचे आहेत हे ते गर्वाने देखील सांगतात. त्यासोबतच त्यांच्या इन्स्टा फेसबुक प्रोफाईल बघता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे त्यांचे आदर्श असून भगवान गडावर देखील त्यांची विशेष श्रद्धा असल्याचं समजत. तर या बटुळे बाबांचं पूर्ण नाव बाबासाहेब बटुळे असून लोक त्यांना बटुळे बाबा म्हणून जास्त ओळखतात . तर अनेकदा वायरल होणारे हे बटुळे बाबा वंजारी समाजाचे आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हाक दिल्यानंतर, ओबीसी असलेल्या बटुळे बाबा यांनी जरांगेंवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. त्यासोबतच काही काळापूर्वी ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले होते. आणि या आंदोलनाची सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने बटुळे बाबा यांनी त्यांचा संताप देखील व्यक्त केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असणारे हे बटुळे बाबा राजकारणाच्या संबंधित मुद्द्यांवर जास्त बोलताना दिसतात.
यासोबतच ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या अनेकांवर देखील बटुळे बाबा टीका करताना दिसतात. “राजेश टोपे, निलेश लंके ओबीसी समाजामुळे निवडून आले. आता त्यांना आमची गरज राहिलेली नाही का?” असा सवाल बटुळे बाबांनी उपस्थित केला होता. आणि निलेश लंके व राजेश टोपे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्या सोबतच मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि तत्कालीन महायुती सरकारचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर देखील बटुळे बाबांनी टीका केली होती.
तर सध्या चालू असलेल्या बीडच्या मस्साजोग / येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी देखील बटुळे बाबा सातत्याने आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. खासकरून धनंजय मुंडेंच्या बाजूने बटुळे बाबा बोलताना दिसतात तर तुम्ही या बटुळे बाबांचे व्हिडिओ पाहता का? बटुळे बाबां बद्दल तुम्हाला काय वाटतं? ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा…