यंदा अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती झाल्या व त्यांचे निकाल देखील तसेच नाट्यमय लागले आहेत. आणि असाच एक मतदारसंघ म्हणजे वसई मतदारसंघ जिथे स्नेहा दुबे यांनी विजय मिळवत त्यांच्या दिवंगत सासऱ्यांच्या खुनाचा व वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला आहे अश्या चर्चा सध्या चालू आहेत. म्हणूनच नेमकं वसई च्या मतदारसंघात काय झालं होत आणि भाजपच्या स्नेहा यांनी कसा विजय मिळवत कसा बदला पूर्ण केला तेच जाणून घेऊयात
तारीख होती 9 ऑक्टोबर, 1989, सकाळी 10.30 वाजता नालासोपारा रेल्वेस्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत वृत्तपत्र वाचत बिल्डर सुरेश दुबे बसले होते. त्यावेळीच तिथे रिव्हॉल्वर घेऊन काही लोक आले आणि गोळ्या झाडून ऐन वर्दळीत बिल्डर सुरेश दुबेंची हत्या केली. ज्यात सुरेश दुबे यांच्या हत्येसाठी भाई ठाकूर आणि माणिक पाटील यांची गँग असल्याचं समोर आलं. त्यानंतर भाई ठाकूरसोबत इतर गुन्हेगार TADA अंतर्गत तुरुंगात गेले. त्यांच्यावर खटला चालला पण, पुराव्याअभावी गेल्या वर्षी 2023 ला भाई ठाकूरसह इतर आरोपींची TADA मधून निर्दोष मुक्तता झाली.
यासगळ्या दरम्यान 1990 च्या दशकात भाई ठाकूरचा भाऊ हितेंद्र ठाकूर राजकारणात उतरले. ते 1990 ला काँग्रेसकडून वसई-विरार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. 1990 नंतर हितेंद्र ठाकूर चारवेळा आमदार झाले. 2009 ला हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांच्या बहुजन विकास आघाडीकडून नारायण मानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा विजयही झाला होता. त्यानंतर पुन्हा हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले आणि त्यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुका जिंकल्या.
मात्र वसई -विरार मध्ये राज करणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांना 2024 च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. हितेंद्र ठाकूर यांचा भाऊ भाई ठाकूरला ज्या हत्या प्रकरणात टाडाअंतर्गत अटक झाली होती त्या सुरेश दुबे यांच्या सून व श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांची कन्या स्नेहा दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांचा या निवडणुकीत पराभव केला. स्नेहा दुबे या सुरेश दुबे यांचा भाऊ श्यामसुंदर दुबे यांच्या सून असून स्नेहा दुबे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली असून त्यांनी 3 हजार मतांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करत वडिलांच्या पराभवाचा व सासऱ्यांच्या हत्येचा बदला घेतला आहे अश्या चर्चा सध्या सुरु आहेत. तर यावर तुमचे मत काय ते कंमेंट अरुण नक्की सांगा