महायुती सरकारला बहुमत मिळाले, महायुती सरकारचा नुकताच शपथविधी देखील पार पडला आणि हा शपथविधी पार पडल्यानंतर सगळं काही आलबेल असताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी सरकारला एका महिन्याच अल्टिमेटम दिल आहे. त्यामुळे नेमक हे अल्टिमेटम काय आहे? मनोज जरांगे पाटील काय म्हणाले आहेत? आणि यामुळे जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस या वादाचा दुसरा अंक पाहायला मिळणार का? तेच जाणून घेऊयात
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पाच डिसेंबरला महायुती सरकारच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तर सरकार स्थापनेनंतर काहीच तासांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा मुद्दा उचलून धरत सरकारला नव अल्टिमेटम दिल आहे. या अल्टिमेटमच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला एका महिन्यात म्हणजेच 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा असं म्हणाले आहेत. तर या सोबतच त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांनी सरकारला घेरण्याचे संकेत देखील दिले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जरांगे पाटलांच नाव भलतंच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनं करून, कुपोषणं करून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा चेहरा बनले. मागील महायुती सरकार च्या कार्यकाळात अनेकदा देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील विदुष्ट आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि याच वितुष्टाचा दुसरा अंक देखील लवकरच पाहायला मिळणार अस सध्या तरी दिसून येतंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. पण मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यामधील हा संघर्ष संपणार? का कोणतं नवं वळण घेणार हा चर्चेचा विषय झालाय.
तर नव्याने स्थापना झालेल्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत, त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यामधील संघर्ष आता संपणार नसून अजूनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्याच्या परिणाम मराठा आरक्षणावर होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तर तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईल का?.
देवेंद्र फडणवीस व मनोज जरांगे पाटलांच्या मधील वादाचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार? ते कमेंट करून नक्की सांगा..