मालेगाव मधील नामको बँकेत झालेल्या fraud संदर्भात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून अश्यातच या fraud मध्ये फसवणूक झालेल्या तरुणांची भेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ तारखेला घेणार आहेत. तर या fraud चा मास्टरमाईंड देश सोडून पाळल्याचही समोर येत आहे. म्हणूनच नेमकं नामको बँकेत काय झालं? आणि हा fraud नेमका काय आहे तेच जाणून घेऊयात
काही दिवसांपूर्वीच मालेगाव मधील नामको बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून १०० कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मालेगावातील जवळपास 12 तरुणांना सिराज नामक व्यापाऱ्यानं मालेगाव मार्केट कमिटीमध्ये नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून या तरुणांकडून बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी त्यांची कागदपत्रं जमा करून घेतली आणि त्यांच्या नावाने मालेगाव लोढा मार्केट येथील ‘नाशिक मर्चंट बँकेत’ त्यांचे खाते उघडून सर्व अकाउंटवर करोडो रुपयांची उलाढाल केली. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचासंहिता लागू असताना, या सर्व घटना झाल्याने हे पैसे ‘व्होट जिहाद’साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तर ईडी, सीबीआय व रिझर्व्ह बँक मध्ये तक्रार देत त्यांनी चौकशीची मागणी देखील केली होती.
या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना अटक केल्यानंतर या संदर्भातील अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. सिराज अहमद याची चहा आणि कोल्ड्रिंक्स एजन्सी आहे. तक्रारदाराचा भाऊ गणेश हा त्याच्या गाडीतून सिराजच्या मालाचा पुरवठा करायचा. सिराजने गणेशला सांगितले होते की, त्याला मक्याचा व्यवसाय करण्यासाठी व शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यासाठी बँक खात्यांची गरज आहे. त्याने गणेश, तक्रारदार जयेश व इतर 10 जणांकडून कागदपत्रे घेत, नामको बँकेत खाते उघडण्यासाठी त्यांना बँकेत नेले होते. बँक खाते उघडण्याचे फॉर्म, एफडी फॉर्म, कर्जाचे फॉर्म आदींवर सिराज अहमदने या सर्वांच्या सह्या घेतल्या. व त्या बदल्यात सिराजने सर्वांना मालेगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
ही 14 बँक खाती 23 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान उघडण्यात आली होती. ईडीने नामको बँकेकडून सर्व 14 बँक खात्यांचे बँक स्टेटमेंट गोळा केले. ज्यानुसार खाते उघडल्यापासून 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत म्हणजेच खाते गोठवण्यापर्यंत या खात्यांवरून एकूण 2200 व्यवहार झाले आहेत. ज्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील एकूण 153 बँक शाखांसह 2200 व्यवहार करण्यात आले होते.
तर सर्व १०० कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारात सुमारे 45 कोटी रुपये प्रगती ट्रेडर्स आणि अहमदाबादच्या ॲक्सिस बँकेच्या एमके मार्केटिंग कडे गेले आहेत. प्रथमदर्शनी हा निवडणूक निधी असल्याचे दिसून येत नसून संशयित काही कंपन्या कर चुकवेगिरीचा प्रयत्न करत असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणातील मास्टरमाईंड महमूद भगड हा देश सोडून पळून गेला असून, महमूद भगड साठी ईडी कडून आता lookout circular जारी करण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ तारखेला फसवणूक झालेल्या तरुणांची भेट घेणार आहेत. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कंमेंट करून नक्की सांगा…