जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या डी गुकेश वर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी जगजेत्ता होत डी गुकेश याने नवा इतिहास रचला आहे. विश्वविजयी झाल्यानंतर सध्या डी गुकेश च धोनी connection मोठं चर्चेत आहे. म्हणूनच डी गुकेश च हे धोनी connection काय आहे तेच जाणून घेऊयात
भारताचा १८ वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत करत गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे.
प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत आता गुकेशने थेट विश्व विजेतेपदाला गवसणी घातली आहे. कँडिडेट्स, बुद्धिबळ ऑलिम्पियाड ते जागतिक अजिंक्यपद असे अनेक टप्पे पार करत अखेर गुकेश विश्वविजेता झाला आहे.
देशाला विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू देणाऱ्या शाळेत गुकेश शिकत होता. विश्वनाथन आनंद व ग्रँडमास्टर प्रज्ञानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गुकेशने बुद्धिबळ खेळायला सुरवात केली, अगदी या खेळासाठी त्याने त्याची शाळा हि सोडली पण बुद्धिबळाचा सराव अखंड ठेवला. आणि त्याने घेतलेल्या या कष्टांचे फळ म्हणजे त्याने मिळवलेला विजय. २०१८ साली सलग १०८ दिवस न हरता खेळण्याचा पराक्रम करणाऱ्या लिरेनला हरवत गुकेशने विजय मिळवला. १३व्या डावापर्यंत सामना बरोबरीत होता. त्यांनतर उत्कंठा वाढवणारे डाव, चार तास व ५८व्या चालींनंतर ७.५ वि. ६.५ अशा फरकाने गुकेशने सामना जिंकला. तर विजयी गुकेशला २५ लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला आहे.
बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना खेळाडूच्या कौशल्यापेक्षाही खेळाडूच्या मानसिक स्थितीची जास्त परीक्षा होते, त्यामुळे मानसिक स्थिती चांगली ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच कँडिडेट स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेशने मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक शोधण्यास सुरूवात केली आणि त्याने पॅडी उपटन यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून कोचिंग घेतली आणि पॅडी उपटन यांनी गुकेशच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पडली. २०११ मध्ये मेंटल कोच पॅडी उपटन यांनी धोनीला देखील विश्वविजेता होण्यास मदत केली होती. २०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकप जिंकण्यात पॅडी उपटन यांची मोठी मदत झाली होती.
विश्वविजेता बनल्यानंतर भावूक झालेल्या गुकेशचा विजयानंतरचा रडतानाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तर तुम्ही तो विडिओ पाहिलात का? आणि यावर तुमची प्रतिक्रिया काय? ते कंमेंट करून नक्की सांगा.