पुणे : बातम्या . इन
पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक बढेकर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोथरूड येथील महापालिकेच्या अण्णाभाऊ पाटील शाळेत मंगळवार (ता. १७) या उपक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता मोबाईल, सागर शिंदे, गौरव शिंदे, अमित शिंदे यांनी केले होते. ५३५ विद्यार्थ्याना नोट पॅड, दप्तर (सॅक), कंपास असे साहित्य बढेकर यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमास चिन्मय चव्हाण, सर्वेश केनी, अनिकेत डोक, जीवन दुधाने यांचे सहकार्य लाभले.