आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांना बौद्धिकासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार या बौद्धिकाला भाजपच्या व शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांनी हजेरी लावली. पण हे बौद्धिक म्हणजे नेमकं काय असतं? या बौद्धिकादरम्यान काय सांगितलं जातं? तेच पाहुयात
नागपूरच्या रेशीम बाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिकाच नियोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे भाजपासोबत असलेले महायुतीतील इतर मित्र पक्ष देखील या बौद्धिकाला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. तर अपेक्षे प्रमाणे महायुती मधील भाजपा व शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार या बौद्धिकाला उपस्थित होते. मात्र अजित पवार व त्यांच्या आमदारांनी मात्र या बौद्धिकाला अनुपस्थिती दर्शवली. हेडगेवारांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून महर्षी व्यास सभागृहात सर्व आमदारांचे बौद्धिक पार पडले. पण हे बौद्धिक नेमकं काय असतं ते पाहूयात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती विकासाद्वारे राष्ट्र विकासावर लक्ष केंद्रित करतो त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास हा त्रिस्तरीय मार्ग अवलंबला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा प्रामुख्याने विविध शारीरिक क्रिया कलाप आणि खेळांद्वारे शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष केंद्रित करतात. तर बौद्धिक विकासासाठी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून भाषणांद्वारे बौद्धिक विकास केला जातो. आणि बौद्धिक विकासासाठी दिल्या जाणाऱ्या या भाषणांना आणि व्याख्यानांनाच बौद्धिक असे संबोधले जाते. ज्याचा उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची बौद्धिक क्षमता वाढवणे हा असतो.
पण या बौद्धिकदरम्यान नेमकी कोणत्या प्रकारची भाषणे दिली जातात आणि कोणत्या प्रकारची माहिती दिली जाते याबद्दल बोलायचं झालं तर या बौद्धिकदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रनिर्मितीसाठीचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा याबद्दल माहिती दिली जाते. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास आपल्याला का वाचायला हवा? आणि तो आपल्याला कसा स्वीकारायला हवा याबद्दल देखील या बौद्धिका दरम्यान माहिती दिली जाते.
हिंदू राष्ट्र व हिंदू विचारसरणीशी जोडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बौद्धिकाला अजित पवार व त्यांचे आमदार या बौद्धिकला जाणार का? यावर अनेकांचे लक्ष होते. मात्र अपेक्षेप्रमाणे अजित पवार व त्यांच्या आमदारांनी या बौद्धिकाला दांडी मारली आहे. “अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व समावेशक राजकारण पाहायला मिळतं. त्यामुळे जर अजित पवारांनी या बौद्धिकला हजेरी लावली असती तर त्यांच्या मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला असता. म्हणूनच अजित पवारांनी या बौद्धिकाला उपस्थिती लावली नाही असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात.
तर यावर तुमचे मत काय? तर कंमेंट करून नक्की सांगा