सर्दी झाल्यानंतर नाक बंद होणे ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात आणि शरीराला आराम मिळवणे कठीण होऊ शकते. थंडीच्या वातावरणामुळे नाकातील उतींमध्ये सूज येऊन नाक बंद होऊ शकते. परंतु, काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय नाक मोकळे करण्यास मदत करू शकतात. चला तर मग, जाणून घेऊया काही घरगुती उपाय जे नाक बंद झाल्यामुळे होणारा त्रास कमी करायला मदत करू शकतात.
१. वाफ घेणे
वाफ घेतल्याने नाक बंद होण्याचे त्रास कमी होऊ शकतो. हे एक प्रभावी उपाय आहे, जो मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे. गरम पाण्यात लवंगाचे तेल किंवा काही लवंग बारीक करून पाणी उकळा आणि त्याची वाफ घ्या. ह्या वाफेमुळे नाकातील सूज कमी होईल आणि श्वास घेण्यात आराम मिळेल.
२. मोहरीचे तेल
लहान मुलांचे नाक बंद झाल्यास, घरगुती उपायांमध्ये मोहरीचे तेल एक प्रभावी उपाय आहे. मोहरीचे तेल नाकात एक ते दोन थेंब टाकून थोडावेळ झोपणे यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते. हे उपाय जुने असले तरी परिणामकारक आहेत.
३. तुळशीच्या पानांचा काढा
सर्दी आणि नाक बंद होणे यापासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाने, लवंगा, आले आणि काळी मिरी उकळून काढा तयार करा. हे काढा पिल्यामुळे सर्दी कमी होईल आणि नाक सुद्धा मोकळे होईल. हे उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा वापरता येईल.
४. ओव्याची पोटली
नाक मोकळे करण्यासाठी ओवा खूप फायदेशीर ठरतो. ओवा भाजून त्याची गरम पोटली तयार करा आणि त्याचा वास घेतल्याने नाक साफ होईल. हे उपाय लहान मुलांसाठी सुद्धा खूप प्रभावी आहे.