ATM Cash Withdrawal: RBI लवकरच ATM कार्ड वापरासाठी आकारण्यात येणारी interchange fee वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतो. याचा परिणाम म्हणून ATM वापरून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे. सध्या, ATM कार्ड वापरून पाचवेळा पैसे काढणं मोफत आहे, पण त्यानंतरच्या transactions वर शुल्क आकारलं जातं आणि त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
शुल्क किती वाढणार?
Indian National Payments Corporation (NPCI) नुसार, पाच मोफत ATM transactions नंतर fee 21 रुपये वरून 22 रुपये होण्याची शिफारस केली आहे. तसेच, ATM interchange fee 17 रुपयांवरून 19 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
Interchange fee म्हणजे जर एखाद्या खातेदाराने दुसऱ्या बँकेच्या ATM कडून पैसे काढले, तर त्याला त्या बँकेला एक ठराविक रक्कम द्यावी लागते. या शुल्कात वाढ होणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.
रिपोर्टनुसार, फि वाढीसाठी सहमती
NPCI आणि बँक तसेच White-label ATM operators मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये ATM fee वाढवण्यावर सहमत झाले आहेत. परंतु, RBI आणि NPCI कडून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.
एटीएम चालवण्याच्या खर्चात वाढ
वाढती महागाई, transportation cost, cash replenishment आणि इतर खर्चामुळे non-metro आणि ग्रामीण भागात ATM operation खर्च वाढले आहेत. यामुळे ATM service providers ने fee structure मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता ओळखली आहे.