
सरकारचा नवा प्लॅन? मनोज जरांगे पाटील यांचा मोठा खुलासा
मराठा आरक्षण नेते Manoj Jarange Patil यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वतःचे चळवळ उभी करणार आहे. सरकारचे दोन मंत्री या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एका मंत्र्याने त्यांना दिली आहे.
Manoj Jarange Patil काय म्हणाले
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभे करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहेत. ते 12 ते 13 दिवस अमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एका मंत्र्याने मला ही माहिती दिली. त्यानंतर 14 दिवसांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्यात येणार आहे. सरकार दोन मंत्र्यांना सोबत घेत नवीन मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे.
Devendra Fadnavis मंगळवारपर्यंत आरक्षणाचा मार्ग काढतील. हैद्राबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, तीन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत लागू होतील अशी मला आशा आहे. शिंदे समिती कडे सात महिन्यांपासून गॅझेटचा विषय आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास झाला आहे. पंधरा दिवसांत संपूर्ण अभ्यास केला जातो.
सुरेश धस यांच्यावर भाजपचा दबाव
Manoj Jarange Patil म्हणाले, धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपने दबाव आणला. पण सुरेश धस यांनी मराठा समाजाला हे सांगणे गरजेचे होते की, माझ्यावर पक्षाने दबाव आणला आहे. मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आमचा सुरेश धस यांच्यावर मोठा विश्वास होता, पण त्यांनी मुंडे यांना भेटून मराठा समाजाचा विश्वासघात केला.
धनंजय मुंडे आणि आमदार धस यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख प्रकरणातील दोषारोपपत्रात बदल होण्याची शक्यता आहे. जर यातील एकही आरोपी सुटला, तर सरकारचे काही खरे राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.