
Swargate rape case: "Do what you have to do, but keep me alive!" – The victim's heart-wrenching plea
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. आरोपी Dattatray Gade याने पीडितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. भीतीने ग्रासलेल्या पीडितेने “काय करायचं ते कर, पण मला जिवंत ठेव…” अशी याचना आरोपीकडे केल्याचे तपासातून समोर आले आहे. याप्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे गाडे याने दोन वेळा अत्याचार केला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
कोर्टातील नाट्यमय वकिली युक्तिवाद
स्वारगेट बस स्थानकात एसटीमध्ये घडलेल्या या घटनेत 12 मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, कोर्टात आरोपीच्या वकिलांनी वेगळाच दावा करत, “हे सर्व काही दोघांच्या संमतीने घडले,” असा युक्तिवाद केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडिता स्वतः बसमध्ये जाताना दिसत आहे, कोणतीही जबरदस्ती किंवा धक्काबुक्की झालेली नाही,” असे आरोपीच्या वकिलांचे म्हणणे होते.
पोलिस तपास आणखी खोलवर
आता 12 मार्चपर्यंत आरोपी गाडे पोलीस कोठडीत राहणार असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपीच्या वकिलांच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का? पीडितेने केलेल्या गंभीर आरोपांमागील सत्य काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.