दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार, ‘या’ अभिनेत्याने केली मोठी घोषणा..

मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेता म्हणून प्रसाद ओकचे नाव घेतले जाते. धर्मवीर चित्रपटातून प्रसाद घराघरातो पोहोचला आणि त्या्च्या अप्रतिम अभिनयाचं कौतुक चोहोबाजूंनी पहायला मिळालं. चंद्रमुखी या सिनेमाचं दिग्दर्शन त्याने उत्तम रित्या केलं.आता प्रसाद आणखी एक मराठी चित्रपट आणण्याच्या तयारीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करणार आहे.
दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर येणाऱ्या या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याची प्रमुख भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुमार तवरामी या सिनेमाचे निर्माते आहेत. तर किरण यज्ञ्योपवीत हे या सिनेमाचं लेखन करत आहे. तर प्रसाद ओक स्वत: या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून एका मुलाखतीमध्ये चित्रपटाबाबत घोषणा मराठीतील नामवंत दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक याने केलीय.