‘राऊत घोटाळ्यात सहभागी’, ED आरोपपत्रात ही दोन नावे का?

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. काल त्यांना कोर्टात हजर केले असता पुन्हा १४ दिवसांनी तुरुंगातील त्यांचा मुक्काम वाढलेला आहे. आता याप्रकरणी नवी माहिती समोर आली असून त्यात अनेक ट्विस्ट दिसत आहेत.ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे. तब्बल ४ हजार पानांचे हे आरोप पत्र आहे.
सुरुवातीपासूनच पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा सहभाग होता असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार 2006 ते 2007 मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास याबाबत तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्याकाळात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. या दोघांचीही नावं ईडीच्या चार्जशीटमध्ये आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे की ईडीच्या आरोपपत्रात ही दोन नावं का आली? तसंच शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच वाधवान हे या सगळ्यामध्ये कसे आले हे समोर आलंय.
या दोन नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती. त्यात संजय राऊत म्हाडा अधिकाऱ्यांसोबत सहभागी झाले होते. त्यानंतर या प्रकरणात राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले होते. यावर आपले नियंत्रण राहावा म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना पुढे केलं आणि गुरु आशिष कंपनीचे संचालक केले. सोसायटी म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यामध्ये द्विपक्षीय करार झाला. त्यामध्ये 672 भाडेकरूंना सदनिका देण्यात, म्हाडासाठी विकास काम करण्यात येईल आणि त्यांना तर उर्वरित क्षेत्र विकासाक विकेल असे या करारात म्हटले होते. पण बांधकाम कंपनीने सर्व अटींची पूर्तता न करता जमिनीची विक्री केली.त्यातून कंपनीला 1034 कोटी रुपये मिळाले हीच रक्कम HDIL ला हस्तांतरित करण्यात आली
पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ED च्या आरोपपत्रात हे नाव आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2022
One and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी. pic.twitter.com/JwqdhPVN6E
त्यात 112 कोटी रुपये प्रवीण राऊत यांना मिळाले या पैकी 9 कोटी 60 लाख रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले. त्यातील काही रक्कम संजय राऊत यांना दिले असून त्यातूनच त्यांनी अलिबाग येथे भूखंड खरेदी केला. एवढेच नाही तर दादर मधील घर याच पैशातून खरेदी केले असा आरोप ईडीने केलाय. ईडीच्या दाव्यानुसार संजय राऊत यांचा खरंच या प्रकरणात सहभाग आहे हे चौकशीनंतर समोर येणार आहे.