वेदांतापेक्षा दुप्पट गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या तयारीत

वेदांता-फॉक्सकॉननंतर कोकणातील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पही आता राज्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येतंय.आरआरपीसीएल कंपनी तीन वर्षांपासून रिफायनरी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. मात्र रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कंपनीने प्रकल्प गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हा प्रकल्प 2018 पासून रखडलेला आहे. या प्रकल्पाला अद्याप ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने कंपनी प्रशासन हा प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नव्हे तर प्रकल्पावर होणाऱ्या खर्चात देखील वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.समजा हा प्रकल्प राज्यात झाला तर अनेक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.