‘आधारकार्डा’लाही एक्सपायरी डेट असते?

कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज झाले आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधारकार्डची गरज भासते. मात्र तुम्हाला माहित आहे का की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड प्रमाणेच आधारकार्डालाही एक्सपायरी डेट असते? आधार कार्ड हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्व माहिती असते. आधार क्रमांक १२ अंकी असतो. आज आपण जाणून घेऊया की आधार कार्ड किती काळापर्यंत वैध असते.
आधार कार्ड किती काळापर्यंत वैध आहे?
जर तुम्ही प्रौढ असाल तर तुमच्या नावाने जारी केलेले आधार कार्ड कायमचे वैध असेल. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड अवैध ठरते. जर मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याला पाच वर्षांपर्यंत निळे आधार कार्ड दिले जाते.
आधार कार्डची वैधता कशी तपासायची?
युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
होमपेजवर दिलेल्या आधार सेवा पर्यायावर जा.
आता “Verify Aadhar number” पर्यायावर जा.
तुम्ही त्यावर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचा आधार क्रमांक टाका.
सुरक्षा कोड टाका आणि Verify वर क्लिक करा.
त्याचे स्टेटस तुमच्या मोबाईलवर येईल.