आई कुठे काय करते: आशुतोषने अरुंधतीसाठी अरेंज केली खास डिनर डेट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ ही मालिक ओळखली जाते. आता अरुंधतीचा नवा संसार सुरु झाला आहे. खास अरुंधतीसाठी आशुतोष घरातच डिनर डेटचं आयोजन करणार आहे. अरुंधती या प्रेमाने भारावून जाणार आहे. दुसरीकडे यश मात्र आपल्या आणि गौरीच्या नात्याबद्दल साशंक आहे. गौरीच्या मनात नक्की काय आहे याचा अंदाज येत नसल्याने तो गोंधळला असून मनातला गोंधळ आप्पांसमोर बोलून दाखवणार आहे.
‘आई कुठे काय करते’ च्या आजच्या भागात सुरुवातीला अरुंधती अनिशसोबत इशाबद्दल बोलताना दिसणार आहे. अनिश आणि इशा यांच्यातील नातं नेमकं कुठवर पोहोचलय याचा ती अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच त्यांच्या या नात्यामुळे देशमुखांच्या घरात पुन्हा वाद होतील याची जाणीव अरुंधती अनिशला करून देणार आहे. त्यानंतर मात्र अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहेत. अनिरुद्धने यापूर्वी अरुंधतीसाठी जे काही केलं नाही ते आशुतोष तिला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तो खास डेटचं आयोजन करणार आहे. घरातल्या घरात स्वतःच्या हाताने सगळं सजवून तो अरुंधतीला खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या गोष्टी तो कॉलेजमध्ये असताना बोलू शकला नाही त्या आता बोलणार आहे. पुन्हा एकदा तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे
त्यावर अरुंधतीही आपल्याला हे सगळं आवडलंय असं म्हणणार आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्यात फुलणारं हे कॉलेजमधलं प्रेम पाहायला प्रेक्षकही उत्सुक आहेत. मात्र आता त्यांचं आयुष्य असंच सुरळीत सुरू राहणार की त्यात नवीन कोणती अडचण निर्माण होणार, यश आणि गौरीच्या नात्याचं नेमकं काय होणार हे मालिकेत समजेलच