शिंदे गटात मतभेदाचा भडका? वर्षा बंगल्यावरील बैठकीत सत्तारांची शिवीगाळ

एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं. ज्या आमदारांनी तसेच खासदारांनी शिंदे गटाला साथ दिली ते काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहीलेले आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराववरुन नाराजी दिसून आली पण नंतर सगळं सुरळीत चाललं होतं. अगदी दसरा मेळावा सुद्धा जोशो उत्साहात करण्यात आला आज (रविवारी) मात्र शिंदे गटात मतभेदाचा भडका उडाल्याची चर्चा सुरु आहे.

वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिविगाळ केल्याचं बोललं जात आहे. त्याच्या या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तार यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा देखील होते आहे.

अब्दुल सत्तार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केली. आपलं काम पूर्ण न झाल्याने सत्तार यांनी खतगावकरांना चांगलेच खडे बोल सुनावले. त्यानंतर आमदार आणि खासदारांनी त्यांची समजून काढली. पण या वादानंतर सत्तार बैठकीला न थांबता निघून गेले. एकूणच या घटनेमुळे सत्तार यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव नाराज झाले आहेत असे सांगण्यात येते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.