अब्दुल सत्तारांचे ग्रह फिरले? आधी फडणवीसांनी सुनावलं आता कोर्टाचा दणका !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय वाटचालीत दररोज एक एक अडचणी येत आहेत असेच चित्र दिसते आहे. ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी त्यांचे नाव टीईटी घोटाळ्यात आले. काल उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकित सत्तारांची चांगलीच कानउघाडणी केली. तर आज औरंगाबाद खंडपीठाने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दणका दिलाय. यामुळे सत्तारांचे ग्रह फिरलेत असंच म्हणायला हवं. 

राज्य महसूल मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या एका आदेशाला औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आलीय. बाजार समितीच्या एका जागेचं हे प्रकरण असून ते न्यायप्रविष्ट होतं, त्यानंतर न्यायालयाने व्यवहाराला मान्यता दिली असताना देखील तत्कालीन महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती. तसेच बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या विरोधात संबंधित लोकं न्यायालयात गेले असता, न्यायालयाने अब्दुल सत्तारांच्या आदेशाला स्थगिती देत भूखंडावरील स्थगिती उठवली आहे.

कालच सत्तारांची कानउघाडणी उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. कारण राज्य सरकारचे काही निर्णय परस्पर जाहीर केल्यामुळं फडणवीस सत्तारांवर चांगलेच संतापले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांसह उताविळ नेत्यांचे कान टोचले होते. एकूणच सत्तारांच्या राजकीय वाटेत अनेक काटे येत असल्याचं दिसत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.