दसरा मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर !

महाराष्ट्रातील राजकारणात काय घडतं याची चर्चा सध्या देशात होते असेच म्हणायला हवे. आजा ठाकरे आणि शिंदे गट काय करणार अशा चर्चा सुद्धा सामान्य माणसांमध्ये होताना दिसत आहेत. या चर्चांमध्ये एक प्रश्न नेहमीच मनात येतो तो म्हणजे ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार का खरंतर अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचे उत्तर दिलेले आहे पण तरी जनता जाणून घेण्यास उत्सूक असते की ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार का
एकनाथ शिंदेंकडून यावर नकारात्मक भूमिका मांडली गेलेली आहे तरी शिंदे गटाकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऑफर देण्यात आलेली आहे. शिंदे गटातले मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक विधान केलंय सध्या त्याची जोरदार चर्चा होतेय.शिवसेनेत पडलेली फूट, खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार हे प्रश्न कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत.
शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे मंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ताकद लावली आहे. दरम्यान आता अब्दुल सत्तारांनी केलेल्या विधानाने शिंदे-ठाकरे एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक विधान केलंय. जालनामध्ये सत्तार बोलत होते त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे आणि त्यांच्यासोबत जुळवून घ्यावे. जर त्यांनी शिंदेंसोबत जुळवून घेतले नाही, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल असा टोलासुद्धा देखील सत्तारांनी लगावला.
शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मोठा दुरावा निर्माण झालाय.दोघेही एकमेकांचे नाव न घेता टीका करत असतात आता या दोघांमधील दरी कधी मिटणार हा प्रश्न आहे. आता सत्तारांच्या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. आता शिंदे गट एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल अनुकूल असल्याचं दिसतंय अशी पण चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीही मंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा अशाच प्रकारचे विधान केलेले होते. मात्र, आता शिवसेना नेत्यांची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय अद्याप तरी स्पष्ट झालेली नाही.