इमरान हाश्मीवर दगडफेक ! नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असून त्याच्या आगामी ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पहलगाममध्ये या चित्रपटाचे शूटिंगचे काम सुरू आहे. मात्र, इथे इमरान हाश्मीला दगडफेक झेलावी लागली आहे याची जोरदार चर्चा होते आहे. इमरान शूटिंग संपवून सेटवरून बाहेर पडला, तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर दगडफेक केली.
‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे शूटिंग संपवून कलाकार फिरायला बाहेर पडले, त्यानंतर काही लोकांनी इमरान हाश्मी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय.इमरान आपल्या सहकाऱ्यांसोबत पहलगामच्या मुख्य बाजारपेठेकडे जात होता तेव्हा ही दगडफेक झाली. त्यानंतर अचानक काही अज्ञात लोकांनी अभिनेत्यासोबत उपस्थित सर्व लोकांवर हल्ला केला. याप्रकरणी अनंतनाग पोलिसांनी एका व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केलीय.