प्रवीण तरडेचं फेसबुक अकाऊंट हॅक ! चाहत्यांना केलं विशेष आवाहन

मूळशी पॅटर्न आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेले दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलंय. यामुळे प्रवीण तरडे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झालं असून इंस्टाग्रामवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. माझ्या फेबसबुकवरून मेसेज आल्यास त्याला रिप्लाय करू नका असं आवाहनही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलंय.
एका पाठोपाठ एक हिट सिनेमांमुळे प्रवीण यांचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड वाढला आहे. सोशल मीडियावर त्यांची सक्रीयता कायम असते. त्यामुळेच, फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यामुळे प्रवीण तरडे काहीसे चिंतेत आहेत. प्रवीण यांच्या या अकाउंटवरून अनेक खोट्या लिंक्स तसेच फोन नंबरची मागणी केली जातेय. चाहते काळजीपोटी या गोष्टीला बळी पडू नयेत म्हणून तरडे यांनी इंस्टावर पोस्ट शेअर केली आहे.