‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार निरोप पण नव्या रुपात भेटणार ‘यश’

माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता निरोप घेणार आहे. हे समजल्यावर श्रेयस तळपदेचे चाहते हळहळले आहेत. या मालिकेमुळे श्रेयस घराघरात पोहोचला होता. पण श्रेयसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण श्रेयसचा आपडी थापडी लवकरच म्हणजे दसऱ्याला रिलीज होतोय. श्रेयसनेच तशी माहिती सोशल मीडियावर दिलीय.

श्रेयस तळपदेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे ‘आपडी-थापडी’ दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहांत ! बऱ्याच दिवसांनी श्रेयसचा सिनेमा येतोय, ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सिनेमा एका छोट्या मुलीभोवती फिरतो. आपडी थापडी हा एक छोट्यांचा खेळ आहे. हा सिनेमा म्हणजे बाप-लेकीची कथा आहे. तो बाबा आहे श्रेयस तळपदे आणि आई आहे मुक्ता बर्वे. सिनेमात कोकणातील पार्श्वभूमीवर दाखविण्यात आलेली आहे. 

सिनेमातली श्रेयस आणि मुक्ताची वेशभूषा पूर्ण वेगळी आहे. गावरान लूक आहे. प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे.या सिनेमात श्रेयस आणि मुक्तासोबत संदीप पाठक, नंदू माधव, खुशी हजारे, नवीन प्रभाकर अशी तगडी कलाकार मंडळी आहेत. या जोडीचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.