केतकी माटेगावकरची भावूक पोस्ट.. म्हणाली,

अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने दोन आठवड्यापूर्वी आत्महत्या केल्यामुळे पुण्यातील सुसगावमध्ये खळबळ उडाली होती. माटेगावकर कुटुंबाला हा मोठा धक्का होता. १५ जुलै रोजी ही दुर्घटना घडली अक्षय अमोल माटेगावकर (२१ वर्षे) याने आठव्या मजल्यावरुन उडी मारून आपलं जीवन संपवलं. माटेगावकर कुटुंब या दुःखातून सावरलेलं नसून अभिनेत्री केतकी माटेगावकर भावाच्या आठवणीने अस्वस्थ होते आहे. तब्बल १५ दिवसांंनंतर केतकीने भावाबद्दल एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
केतकीने त्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे, ”माझा अक्षु माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, मल्टीटॅलेंटेड, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू? लिहू की नको लिहू. 21 वर्षांच्या आठवणी काही शब्दात कशा लिहू? असा भावूक प्रश्न केतकीने त्या पोस्टमधून केला आहे. केतकीची सोशल मीडियावरील पोस्ट वाचून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
‘तुझा लहानपणीचा रूठ के हमसे कभी ते एक अप्रतिम ख्याल गायकी, हा प्रवास मी पाहिलाय खुप खुपच जवळून.. माझा लहान भाऊ एक अप्रतिम कलाकार होता, याचा मला कायम अभिमान वाटत राहील. मी हे वाक्य तुझ्यासाठी लिहेन असं वाटलं नव्हतं कधीपण.. तू जिथे कुठे असशील, अशी कल्पना करतेय की तू गात असशील, आनंदी असशील, तू कायम आमच्या मिठीत, आमच्यासोबत राहशील. अशा शब्दात केतकीने आपले दुःख व्यक्त केलेले आहे.