वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘आदिपुरुष’ची रिलीज डेट ढकलली पुढे..

आदिपुरुष या सिनेमाच ट्रेलर काही दिवसापूर्वी रिलीज झाला होता त्यानंतर रंगलेला वाद आपल्याला चांगलाच माहित असेल. या चित्रपटामुळे दिग्दर्शक ओम राऊत चांगलेच चर्चेत आले होते. या चित्रपटातील VFX आणि रावणाची भूमिका यावरून या चित्रपटाला कमालीचं ट्रोल करण्यात आलं होतं. आज पुन्हा एकदा आदिपुरुषची चर्चा आहे कारण या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे.आदिपुरुषच्या ट्रेलरमुळे उफाळलेला वाद ओम राऊतला चांगलंच महागात पडला असं बोललं जातंय.
ओम राऊतनेच एक पोस्टर शेयर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पूढे ढकलण्यात आलेली आहे असं जाहीर केलंय. आता आदिपुरुष थेट पुढील वर्षात जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुष हा फक्त एक चित्रपट नाही तर प्रभू श्रीरामावरील आपल्या भक्तीचे, इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अद्भूत अनुभव मिळणार आहे पण त्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे.आता ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे अशा आशयची पोस्ट ओम राऊतने शेअर केलेली आहे. या आधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार होता.