आदित्य ठाकरेंच्या सुरक्षाव्यवस्थेत हलगर्जीपणा?

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहेत आजपासून कोकणात शिवसंवाद यात्रा असून सकाळी रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे यांची मोठी सभा झाली. यावेळी बोलताना आदित्य यांनी बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये मोठा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. 

आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. या सुरक्षेमध्ये राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिले पण त्यांना पोलीस गाड्या दिल्या नाहीत. त्यामुळे या दौऱ्यासाठी सुरक्षा रक्षक खासगी वाहनाने आले. झेड सुरक्षेतील सुरक्षा रक्षकांना गृह विभाग गाड्या देते पण आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांना गाड्या दिलेल्या नाहीत, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडला तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय. 

या चर्चांवर माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे आहेत असे म्हणून आदित्य ठाकरे यांनी मात्र एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. तसेच सुरक्षेपेक्षा फॉक्सॉकॉन प्रकल्प महत्त्वाचा, असे सांगत या डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झालंय असं वक्तव्य आदित्य यांनी केलंय. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.