मुस्लिम मुलीशी विवाह केला म्हणून नगरमधील ‘त्या’ तरुणाची हत्या?

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातून दीपक बोर्डे हा तरुण बेपत्ता झाला होता. याचे राजकीय पडसादसुद्धा उमटले होते. या प्रकरणी मोठी अपडेट हाती आलेली आहे. या तरुणाचा खून केल्याची कबुली अटकेतील आरोपीने दिली आहे. मजनू शेख, इमरान शेख, समीर शेख, अजीज शेख अशी आरोपींची नावे आहेत. दीपक बर्डे प्रकरणातला हा सगळ्यात मोठा खुलासा मानला जातोय. तसेच महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम मुलीशी विवाह केला म्हणूनच दीपक बर्डे या तरुणाचा खून केला का? याबाबत मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र मुस्लिम मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, या गोष्टीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
आदिवासी भिल्ल समाजाच्या मुलाचे एका मुस्लिम मुलीशी विवाह केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली अशी चर्चा सध्या श्रीरामपूरमध्ये होतेय.दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. त्याचा मृतदेह शोधणं हे मोठं आव्हान पोलिसांपुढे उभं आहे. दीपक बर्डेचा मृतदेह गोदावरी नदी फेकल्याचं आरोपींनी सांगितलं असून मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी एनडीआरएफची देखील मदत घेतली जाते आहे.दीपक बेपत्ता झाल्यानंतंर त्याचे राजकीय पडसादही उमटले होते. नितेश राणे यांनी श्रीरामपुरात मोर्चा काढला होता.