शेतकऱ्यांना दिलासा ! नुकसानभरपाईची रक्कम थेट बॅंक खात्यामध्ये, कधी पासून होणार सुरवात?

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलाय.त्यानुसार मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्याच्या भरपाईपोटी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार अस्याचे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय.
जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मदतीची घोषणा करण्यात आलीय. राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आलीय. एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.
अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला होता. शिवाय या विभागात सोयाबीनचा अधिकचा पेरा आहे. त्यामुळे नुकसानीची दाहकता अधिक होती. उस्मानाबाद जिल्हा वगळता, उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1 हजार 596 कोटींची तरतूद केली गेलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या काही दिवसांमध्ये मदतीची रक्कम खात्यावर जमा होणार आहे.