ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो?काय आहे ‘या’ व्हिडीओचे सत्य?

सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडोओ व्हायरल होत असतात. अनेक दिवसांपासून ल्युपो नावाचा केक बाजारात आला असून त्यात एक गोळी आढळते. त्या गोळीमुळे लहान मुलांना अर्धांगवायू होतो असा आशय असणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तुमच्या मुलांची काळजी घ्या असा मेसेजसुद्धा त्यात देण्यात येत आहे.
फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडोओ व्हायरल झालाय. फक्त हिंदू देशात तो विकला जातोय असेही काही जणांचे म्हणणे आहे. याची पडताळणी करण्यासाठी ल्युपो चॉकलेट असे गुगलवर टाकून शोध घेतला. त्यावेळी ल्युपो चॉकलेट खाल्ल्याने अर्धांगवायू होतो या संबंधितातील फॅक्ट चेक आढळून आले. हे फॅक्ट चेक २०१९ आणि २०२१ मध्ये करण्यात आले होते.
एक वर्षापूर्वी तुर्कीतील फॅक्ट चेक करणाऱ्या teyit या संकेतस्थळाने या घटनेवर आधारित एक संशोधनात्मक अहवाल समोर आला. त्यानूसार हा व्हिडिओ २०१९ ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ wishe press या इराकी यु ट्यूब वाहिनीने पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये Aspilic नावाची वस्तू दिसते आहे ही कंपनी फ्रोझन फूड बनवते. त्याची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ ही इराक असल्यामुळे तिथेच हा व्हिडोआ काढल्याची शक्यता वाटते आहे. यातून एकच गोष्ट सिद्ध होते ल्युपो नावाच्या चॉकलेटमध्ये औषधाची गोळी सापडल्याचा दावा केला जाणारा व्हायरल व्हिडिओ ऑक्टोबर २०१९ पासून सोशल मीडियावर शेअर केला जातोय. भारतात या चॉकलेटची विक्री होत असल्याची बातमी नाही. ही घटना २०१९ मधली असून हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे