आता शिवसेनेचे ‘मिशन लोकसभा’, ‘यूपी’तील शिवसेना नेत्यांना लावले कामाला !

भाजपने दोन आत्तापासूनच लोकसभेची जोरदार तयारी सुरु केलीय. आता शिवसेनासुद्धा तयारीला लागलेली असून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोर्टेबांधणी सुरु केलीय. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला उतरती कळा लागली पण अडीच महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांना थोपवण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आलंय. शिवसैनिकांना पुन्हा एकदा त्यांनी उभारी दिलेली आहे. तेव्हा आता उद्धव ठाकरे यांनी देखील लोकसभेची तयारी सुरु केलीय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन जमीन दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर ठाकरे यांनी थेट भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लक्ष केंद्रीत केलंय. ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे ‘यूपी’चे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी ३० जिल्हाप्रमुखांची घोषणा केली असून शिवसेना संघटना वाढविण्याचा आदेश ठाकरेंनी दिलेले आहेत.
उत्तर प्रदेशात भाजपाचे वर्चस्व आहे. त्यात महाराष्ट्रात झालेले सत्तांतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना युती तुटणे यामुळे आता शिवसेना आणि भाजप कट्टर शत्रू झालेले आहेत. तेव्हा आता तडजोडीचे राजकारण नाही असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची निवड केलीय.
महाराष्ट्रा सोबत उत्तर प्रदेशमध्ये पक्षसंघटनेवर शिवसेनेने भर दिला आहे. पहिल्या टप्प्यात 30 जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. तर आगामी काळात पक्ष प्रमुख तसेच शिवसेनेतील बडे नेते उत्तरप्रदेशात असणार आहेत. केवळ लोकसभा निवडणूकच नव्हे तर महापालिका निवडणूकांमध्येही शिवसेनेचा उमेदवार राहणार असल्याचे अनिस सिंह यांनी सांगितले आहे.