वेदांता-फॉक्सकॉननंतर आता ‘ही’ कंपनी महाराष्ट्र सोडणार

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता फोन पेने महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे.फोन पेने मुंबईमधील ऑफिस कर्नाटकात हलविण्याचा निर्णय घेतला असून आता यावरुन वादंग होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर टीका होते आहे. राजकारण चालू द्या. आपण कुठे कमी पडत आहोत ते पाहा असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

एका वर्तमानपत्रात यासंदर्भात जाहिरात छापून आलेली आहे. सार्वजनिक नोटीस प्रकारातील ही जाहिरात असून त्यात मुंबईतील PhonePe कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सूचित केलेले आहे. वेदांता महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेला आणि राज्याने मोठ्या संख्येने नोकरीच्या संधी गमावल्या. तेव्हा शिंदे -फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठली होती. आता या वादानंतर फोन पे चे कर्नाटकासा जाणे म्हणजे आगीत तेल ओतणे असा प्रकार झालेला आहे.  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केलाय.

फोन पेचं मुंबईतील अंधेरीमध्ये मुख्य कार्यालय आहे. हे कार्यालय कर्नाटकात हलवण्यासाठी कंपनीची खास बैठक झाली असून मुंबईतील ऑफिस महाराष्ट्राबाहेर म्हणजे कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याता आलेला आहे. एकदा मंजुरी मिळाली की फोन पेचं मुख्य कार्यालय मुंबईतून कर्नाटकात शिफ्ट केलं जाणार आहे. फोन पे कडून वर्तमानपत्रात जी जाहिरात दिलेली आहे त्यात असेच म्हटले आहे. कंपनी कायदा, 2013 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे. ज्यासाठी कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफारची पुष्टी मिळावी यासाठी 16 ऑगस्ट, 2022 येथे झालेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला असेही जाहिरात म्हटलेले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.