व्वा! रेल्वेच्या तिकीटाएवढ्याच दरात करता येणार विमान प्रवास… ही कंपनी देतेय ‘ऑफर’

दिवाळीची सुट्टी येते आहे तुम्ही सणासोबत फिरायचा प्लॅन करत आहात तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने तुम्ही नेहमी फिरत असला पण तुम्हाला कोणी सांगितले रेल्वे तिकीटाच्या दरात विमानाने प्रवास करा तुम्ही काय म्हणाल हे कसे शक्य आहे? पण आता तुम्ही रेल्वेच्या दरात विमान प्रवास करुन तुमच्या भटकंतीचा आनंद घेवू शकता.देशांतर्गत उड्डाण सेवा देणाऱ्या एका विमान कंपनीनं ही ऑफर आणलेली आहे.

आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करावा असे अनेकांना वाटत असते पण काही कारणामुळे ते शक्य होत नाही मात्र आता तुम्ही हे स्वप्न सहज पूर्ण करू शकता. कारण ‘अकासा एअर’ ही खासगी विमान कंपनी रेल्वे तिकिटांच्या दरामध्ये विमानाचं तिकीट देते आहे. हे तिकीट तुम्ही कसं बुक करू शकता ते आता जाणून घ्या.

देशातील निवडक मार्गांवर अकासा एअर तिकीट बुकिंगमध्ये मोठी सूट देत आहे. ट्रेनमधील एसी क्लासच्या तिकिटाच्या किंमतीत तुम्ही या हवाई सेवेचा आनंद घेऊ शकता. अनेकांना कंपनीची ही ऑफर प्रचंड आवडली असून, तिकीट बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळतोय असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला रेल्वेच्या दारत विमानाचे तिकीट बूक करायचे असेल तर अकासा एअरलाइनच्या वेबसाइटवर जावं लागलं.

तिकीटाचं बुकिंग करण्यापूर्वी सवलतीच्या दरात कोणत्या मार्गांवर तिकिटं दिले जाते आहे ते आधी नीट पाहून घ्या. सवलतीच्या दरात तिकिटं दिली जात असलेल्या मार्गांवरील प्रवास तुम्हाला करायचा असेल, तर तुम्ही वेबसाइटद्वारे तिकीट ऑनलाइन बुक करू शकता.

अकासा एअर ही विमानसेवा शेअर बाजारतज्ज्ञ दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनी काही काळापूर्वी सुरू केली होती. लाँच झाल्यापासून ही एअरलाइन सतत चर्चेचा विषय आहे. आता अकासा एअरने सुरू केलेल्या ऑफरमुळे ‘इंडिगो’ आणि ‘गो फर्स्ट’ या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या अडचणी वाढू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.