‘देशातील कोणत्या विमानतळाचं नाव वैमानिकाच्या नावावर आहे?’ उत्तर न आल्याने स्पर्धकाने सोडला खेळ

‘कौन बनेगा करोडपती १४’ हा शो दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होतोय.या शोमधील एका एपिसोडचा प्रोमो व्हायरल होतोय त्यात स्पर्धकाला २५ लाखांसाठी एक प्रश्न विचारण्यात आला, पण स्पर्धकाला त्याचं उत्तर देता आलेलं नाही.
स्पर्धक आणि डेंटिस्ट असलेली ऐश्वर्या रुपारेल हॉट सीटवर बसलेल्या होत्या. ऐश्वर्याने योग्य उत्तरं देत १२ लाख ४० हजारांपर्यंतचा गेम खेळला पण त्यानंतर तिने २५ लाखांच्या प्रश्नावर मात्र तिला खेळ सोडावा लागला. तो प्रश्न कोणता होता माहितए? कोणत्या ठिकाणी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव वैमानिकाच्या नावावर आहे? असा प्रश्न २५ लाखांसाठी ऐश्वर्याला विचारण्यात आला होता. त्यासाठी तिरुवनंतपुरम, जोधपूर, भुवनेश्वर आणि गुवाहाटी असे पर्याय देण्यात आलेले होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर न आल्याने ऐश्वर्याने पुढे न जाता खेळ सोडण्यावर शिक्कामोर्तब केलं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भुवनेश्वर असे आहे