दसरा मेळाव्यात एकाच वेळी ठाकरे अन् शिंदेंचं भाषण सुरु झालं तर आधी कुणाचं ऐकणार? अजित पवार म्हणतात…..

शिंदे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार हे ठरलेलं आहे. आता हा मेळावा कसा होणार त्याची कशाप्रकारे तयारी सुरु आहे याची चर्चा सुरु झालेली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही नेते दसरा मेळाव्यात भाषण करणार आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिंदे गटाचा हा पहिला मेळावा आहे. तर राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे दसरा मेळाव्यात काय सांगतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हा मेळावा एकाच दिवशी म्हणजे दसऱ्याला होणार आहे पण त्याची वेळ ठरलेली नाही म्हणजे दोन्ही नेते नेमक्या कोणत्यावेळी भाषणाला उभे राहणार याची माहिती हाती आलेली नाही. पण समजा दोघांचे भाषण एकाचवेळी सुरु झाले तर नेमकं कोणाचं भाषण ऐकायचं हा मोठा प्रश्न आहे.

यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, दोन्ही गटात इर्षा निर्माण झालेलीआहे. जर दोघांचे भाषण एकाच वेळी सुरू झाले तर आधी उद्धव ठाकरें यांचे भाषण बघणार त्यानंतर एकनाथ शिंदेंचे भाषण बघणार असे अजित पवार यांनी म्हटलेले आहे. आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेबरोबरचे ऋणानुबंध जपणार आहोत असेही अजित पवार यांनी सांगितले. यावेळी अजित पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. अशोक चव्हाण यांनी शिंदेसंदर्भात जो गौप्यस्फोट केला त्याबद्दल विचारले असता अजित पवारांनी सांगितले अशोक चव्हाण आमच्याकडे आलेले नव्हते. शिळ्या कढीला ऊत आणू नका असेही पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.