महाकालचे दर्शन न घेताच परतले आलिया-रणबीर कारण…. 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी दोघेही महाकालच्या मंदिरात दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. मात्र रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी केलेल्या बीफबाबतच्या वक्तव्याचा हिंदू संघटनांनी त्यांचा निषेध केलाय त्यामुळे उज्जैनहून दर्शन न घेताच परतावे लागले आहे.

काही दिवसांपूर्वी रणबीरची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये रणबीर त्याला बीफ आवडत असल्याचे म्हणत होता. रणबीर ट्रोल करण्यासाठी ही जुनी मुलाखत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आणि ती पाहता पाहता व्हायरल झाली.आधीच ब्रह्मास्त्र बॉयकॉट करण्याची मागणी केली जात होती, या व्हिडिओनंतर या मागणीला आणखी जोर चढला आहे.

जेव्हा रणबीर कपूर पत्नी आलियासह उज्जैन याठिकाणी महाकाल मंदिराला भेट देण्यासाठी पोहोचला तेव्हा बजरंग दल आणि इतर संघटनांनी या जोडप्याला विरोध केला. विरोध इतका वाढला की या जोडप्याला दर्शन न घेताच मुंबईला परतावे लागले. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पकडण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती हाती आलीय. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.