ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर पत्र लिहून आरोप

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे व ठाकरे गटात जोरदार राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्य – बाण चिन्ह काढून घेतले व त्याऐवजी दुसरी चिन्हे व नावेही दोन्ही गटांना देण्यात आली आहेत. यानंतर वातावरण शांत होण्यापेक्षा अधिक तापत चाललं आहे. ठाकरे गटाने आता थेट निवडणूक आयोगाला लक्ष्य केल्याचं दिसून आलं आहे. ठाकरे गटाने एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिले असून आता निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

असं आहे ठाकरे गटाने लिहिलेलं पत्र

नाव आणि चिन्ह वाटप करताना विरोधी गटाला फायदा होईल असा निर्णय दिला असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाने पक्षपात केला आहे असं ठाकरे गटाने म्हणलेलं आहे. या पत्राद्वारे निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या शैलीवर टीका केली गेली आहे. आमची देण्यात आलेली चिन्हे ही आयोगाच्या वेबसाईट झळकली. म्हणूनच आमच्या योजनांचा विरोधी गटाला सुगावा लागला. कारण दोन्ही गटांनी एकसारखी चिन्हे कशी काय दिली? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. ठाकरे गटाने लिहिलेल्या पत्रामध्ये १२ विविध आरोपांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.