गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी

आजपासून धुमधडाक्यात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो आहे.नऊ दिवस देवाची जागर केला जातोय. ठिक ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं एक मोठी मागणी केली आहे. गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं आहे.
गरबा हा काही इव्हेट नाही तो श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय आहे. त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्याआणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केलेली आहे. इतर धर्मीय गरबा महोत्सवात सहभागी होवून हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आत्ताच काळजी घेतलेली बरी हाच उद्देश विश्व हिंदू परिषदेचा असल्यामुळे अशी मागणी करण्यात आली आहे.