सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला प्रश्न ‘Who are you’?

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सुप्रीम कोर्टात सुरु असून त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आज (७ सप्टेंबर) याप्रकरणी सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधिशांच्या खंडपिठासमोर सुनावणी पार पडली. पण अवघ्या पाच मिनिटात निकाल देण्यात आला त्यात पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधिशांनी खरी शिवसेना असल्याचे सांगणाऱ्या शिंदे गटालाच Who Are You असा प्रश्न केला आहे. यावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. सरन्यायाधिशांच्या या प्रश्नावर आता शिंदे गटाला उत्तर द्यावेच लागणार असून, त्यानंतर सर्वच प्रश्न निकाली लागतील असं विधान केलंय.

यावेळी दानवे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे शिंदे गटाने आगामी निवडणुकांचा धसका घेतलाय. तर दुसरीकडे चिन्ह गोठवण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवर चंद्रकांत खैरे यांनीदेखील प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय. धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारखं आहे. चिन्ह गोठवलं तर शिवसैनिक अधिक आक्रमक होतील असं चंद्रकांत खैरे म्हणालेत. 

आज सरन्यायाधिशांनीच आजच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटालाच तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारला आहे. त्यावर शिंदे गट नेमकं काय उत्तर देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून, 27 सप्टेंबर रोजी न्यायालयात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.