Amey Wagh: ‘जंगलात वाघ एकटाच असतो…’ अमेय कुणावर चिडला?

सोशल मीडियावर कधी कोणाची पोस्ट व्हायरल होईल आणि कोणाची चर्चा होईल ते सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अभिनेता अमेय वाघच्या पोस्टची जोरदार चर्चा होते आहे.अमेयनं फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यानं जंगलात राघू Sumeet Raghvan खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी. असे लिहीले आहे.
आता या पोस्टवरुन अमेय आणि सुमीत यांचे काही बिनसले आहे आणि त्यावर अमेय व्यक्त झालाय असं साधारणपणे लक्षात येतंय. नेटकऱ्यांनी यावर अमेयला प्रश्न विचारले आहेत, फास्टर फेणेच्या वेळचा हा वाद आहे का, असं काय झालं की अमेय हा सुमित राघवन यांच्यावर चिडला आहे, अमेय हा एकटाच वाघ आहे…. अशा कमेंटसुद्धा आलेल्या आहेत.
अमेयच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नेमका विषय काय आहे? किंवा नक्की काय झालंय अशी चौकशी जिथे करण्यात आलेली आहे तिथे पण वाघ आडनाव असूनही डरकाळी मांजरेकर फोडतात ना किंवा तू आडनावाने वाघ असलास तरी स्वभाव आणि दिसण्यावरून वटवाघूळ वाटतोयस…. याची कृपया नोंद घ्यावी आणि राहिला सुमितचा प्रश्न तुकच्या अंगठयाचीही सर नाही तुला असा टोला सुद्धा लगावण्यात आलाय. एकाने तर आता चित्रपट सृष्टीतही प्राणिसंग्रहालय सुरू झालेलं दिसतंय असे म्हटले आहे.
अनेकांनी सुमित आणि अमेय यांच्यात झालेला वाद त्यानंतर अमेयनं केलेली पोस्ट असा तर्क बांधलेला आहे. अमेयच्या पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे एवढे मात्र खरे आहे.