‘माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…’ सुमित राघवन-अमेयमधील वाद पेटला; फेसबुकवरच भिडले

सोशल मीडियावर अभिनेता अमेय वाघ यांची पोस्ट सध्या गाजते आहे. ज्या पद्धतीने त्याने लिहीले आहे त्यामुळे चाहते गोंधळात पडले असून त्यातून नवा वाद नक्कीच निर्माण होणार आहे. आता हे प्रकरण काय आहे ते पाहूया. अभिनेता अमेय वाघने काल पोस्ट शेअर केली. त्यात त्याने, जंगलात राघू (सुमीत राघवन) खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी असे लिहील्यामुळे सहाजिकच तो सुमीत संदर्भात राग व्यक्त करतो आहे. या पोस्टमध्ये त्याने सुमीत राघवनला टॅग करण्यात आलं..
आता सुमीत राघवननेही अमेयच्या या पोस्टवर रिप्लाय केलेला आहे. सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय…कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी असे म्हटले आहे. त्याने ही पोस्टमध्ये अमेयला टॅग केलेले आहे आता तर वादाची ठिणगी पडणार यात शंकाच नाही. त्यावर अमेयने उत्तर दिले आहे, वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय अशी खोचक पोस्ट शेअर केली असून त्यातही सुमीतला टॅग केलंय.त्यावर सुमीतवे उत्तर देताना म्हटले आहे की अमेय वाघ घाबरून ठोकलेली ही आरोळी असते, डरकाळी नव्हे…आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे. यालाही अमेयने प्रत्यत्तर दिलंय प्रकरण कितीही गंभीर असलं तरी मी तेवढाच खंबीर आहे. त्यावर सुमीत राघवन म्हणतोय, एक असतो कॉन्फिडन्स, मग असतो ओव्हर कॉन्फिडन्स आणि मग येतो अमेय वाघ…!
येथे वाद थांबेल असे वाटत असताना अमेय म्हणतोय, कोण किती पाण्यात आहे ते बघूच ना उद्या संध्याकाळी !!! सुमीत राघवन आता #लागलीपैज” असं अमेयने म्हटले आहे. तर सुमीत राघवननेही त्याला प्रत्युत्तर देत “अमेय वाघ पाण्यात राहून माशाशी आणि इंडस्ट्रीमध्ये राहून माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…बघू उद्या संध्याकाळी कोण वरचढ ठरतं…आता तर #लागलीपैज” असे म्हटले आहे. एकूणच फेसबूकच्या माध्यमातून सुरु असलेलं हे वॉर सध्या गाजत आहे. आता हा वाद का झालाय ते माहित नाही पण काहीजणांनी नव्या सिनेमाचं प्रमोशन असे म्हटले आहे तर अनेक जण सुमीत आणि अमेयमधील हा वाद फार पूर्वीचा आहे, असे सांगताना दिसत आहे. आता यावर आज म्हणजे २६ सप्टेंबरला याचा उलगडा होईल.