
Aamir Khan and Gauri Spratt: Talks of a third marriage unravelled!
बॉलिवूड सुपरस्टार Amir Khan पुन्हा एकदा चर्चेत आहे, आणि यावेळी कारण त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित आहे. 60 वर्षांच्या आमिर खानने एका खासगी गेट-टुगेदरमध्ये Gauri Sprat ची ओळख करून दिली, ज्यामुळे त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना जोर आला आहे.
Gauri Sprat कोण आहे?
Gauri Sprat ही मूळची बेंगळुरूची असून, ती अनेक वर्षांपासून आमिर खानच्या “आमिर खान फिल्म्स” प्रॉडक्शन हाऊससाठी काम करत आहे. तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समधून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये शिक्षण घेतले आहे. तिचे वडील आयरिश असून आई तमिळियन आहे. गौरी एका 6 वर्षांच्या मुलाची आई आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचे नाते
रिपोर्ट्सनुसार, आमिर आणि गौरी यांची ओळख तब्बल 25 वर्षांपासून आहे. मात्र, गेल्या वर्षभरात त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. 13 मार्च रोजी मुंबईत एका खासगी समारंभात आमिरने गौरीची ओळख मीडियाला करून दिली. पण त्याने पापाराझींना तिचे फोटो न काढण्याची विनंती केली होती.
आमिर खानचे आधीचे विवाह
आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ता हिच्यासोबत पहिले लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण राव हिच्याशी दुसरे लग्न केले, आणि त्यांना एक मुलगा आहे. 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट जाहीर केला असला, तरी आजही दोघांचे चांगले संबंध आहेत.
आमिर आणि गौरीच्या लग्नाच्या चर्चा किती खऱ्या?
सध्या आमिरने अधिकृतपणे लग्नाची घोषणा केलेली नाही. मात्र, त्याने गौरीला आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणून सर्वांसमोर आणल्याने या चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत