अमित शाह यांचा ताफा जाण्यासाठी Ambulance अडवली, व्हिडीओ व्हायरल !!

सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संदर्भात एकक व्हिडीओ व्हायरल होतोय. अमित शाह यांचा ताफा जातानाचा मुंबईतील हा व्हिडीओ आहे. हा ताफा जाताना एक रुग्णवाहिकाही (Ambulance) पोलिसांनी अडवली होती, असं व्हिडीओमध्ये दिसतंय. यावरुन सोशल मीडियात चर्चांना उधाण आलंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय ते समजून घेऊन. व्हायरल व्हिडीओमध्ये एका वाहतूक पोलिसाने एका बाजूची वाहतूक रोखून धरली असल्याचं दिसलंय. यानंतर एका मागून एक गाड्या जाताना दिसतात. या व्हिडीओमध्ये रुग्णवाहिकेचा सायरनही वाजताना ऐकू येतो आहेत. तसंच पोलिसांच्या वाहनांचाही आवाज व्हिडीओ कैद झालाय.

वरील व्हिडीओ ट्वीटरवर अपलोड करत अनेकांनी मुंबई वाहतूक पोलिसांवर टीका केली होती. रुग्णवाहिकेला थांबवून मंत्र्यांचा ताफा का जाऊ दिला गेला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. अखेर या सगळ्या मुंबई वाहतूक पोलिसांचं काय म्हणणंय, तेही समोर आलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सदर व्हिडीओ हा अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथील आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याकारणाने या ठिकाणची वाहतूक रोखण्यात आली होती. याचवेळी एक रुग्णवाहिकाही त्याठिकाणी होती.

पण महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत कुणीही रुग्ण नव्हता, असंही पोलिसांनी म्हटलंय. तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेचा सायरस बंद होत नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरस सुरुच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलंय. याबाबत रुग्णवाहिका चालकाचाही जबाबब लवकरच नोंदवून घेतला जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय. अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. रविवारी त्यांचं मुंबईत आगमन झालं होतं. तर सोमवारी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.