पंकजा मुंडे शहांच्या मुंबई दौऱ्यात का नव्हत्या?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईचा दौरा केला. हा दौरा मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. मुंबईसाठी भाजपला दीडशे नगरसेवकांचे टार्गेट देण्यात आले. भाजप कोअर कमिटीच्या बैठका असू दे किंवा शहांचा मुंबई दौरा यामध्ये भाजपच्या एक नेत्या कुठेच दिसल्या नाहीत. आपण बोलतो आहोत पंकजा मुंडे यांच्याबद्दल. भाजपची बैठक असो किंवा अमित शहांसोबत मिशन मुंबई ठरत असताना पंकजा मुंडे गायब होत्या. त्या स्वतःला भाजपच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवत आहेत का अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

अगदी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठका झाल्या. त्यात पंकजा उपस्थित होत्या अगदी फडणवीस यांच्यासोबत त्यांचे खेळीमेळीचे वातावरण दिसले.पंकजा पुन्हा सक्रिय झाल्यात असे बोलले गेले त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल असे वाटत होते पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. त्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त करुन दाखवली. मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी त्या उपस्थित नव्हत्या. खरंतर राज्यात भाजपचं सरकार असताना पंकडा सक्रिय हव्यात पण प्रत्यक्षात तसे काही दिसत नाही.

जेव्हा अमित शहा मुंबईत आले तेव्हा पंकजा मुंडे दिसतील अशी अपेक्षा होती. कारण हा दौरा म्हणजे मिशन मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकणे हाच उद्देश होता. अमित शहा यांच्या उपस्थित फडणवीस यांच्या बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी भाजपचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते पण पंकडा मुंडे तिथे दिसल्या नाहीत. अमित शहा दिल्लीला रवाना होण्यापूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची विमानतळावर बैठक झाली त्यात महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकित अमित शहा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकि संदर्भात निर्देश दिले तिथे ही पंकजा मुंडे दिसल्या नाहीत. याबाबत 

रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले गौरी गणपतीच्या कार्यक्रमामुळे त्या येवू शकल्या नाहीत. पंकजा यांनी त्यांच्या ट्विटरवरून गौरी गणपतीचे फोटो शेअर केले आणि  गोपीनाथ मुंडे ट्रस्टकडून गौरी गणपती स्पर्धा महोत्सव आयोजित केला होता त्या कार्यक्रमात हजेरी लावण्याचा पंकज यांनी सांगितले. पण अमित शहा यांचा दौरा आधीच ठरला होता आणि नेमकं त्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी कार्यक्रम घेतल्यावर पंकजा नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आता येत्या काळात भाजप पंकडा मुंडे यांची नाराजी कशी कमी करतं तसेच त्यांच्यावर का. जबाबदारी देतं ते येत्या काळात समजेलच. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.