अमृता फडणवीस यांचा ठाकरेंवर टीकेचा बाण !

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटाला शिवसेना नाव लावता येणार नाही असा निर्णय शनिवारी रात्री उशिरा दिला होता. अंधेरी पूर्व विधनसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय तातडीने घेण्यात आला. हा तात्पुरता निर्णय जरी असला तरी यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. सोशल मीडियवार याची जोरदार चर्चा झाली. राजकीय वातावरणात याचे पडसाद उमटले. अगदी सामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांनी ट्विट, फेसबूकच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या. त्यातली एका ट्विटची चर्चा जरा जास्त झाली आणि ते ट्विट केलं होतं मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी.

अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अमृता फडणवीस यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मात्र, ठाकरेंच्या गोटातून अद्याप त्यावर प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. माध्यमांसोबत बोलतानाही ही त्या उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढत असतात. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रविवारी ट्विट करत तुम्हाला काय वाटते, पुर्वीच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का कोणता वाटतो असे म्हणत ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

पूर्वीच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का कोणता वाटतो? असा प्रश्न विचारत अमृता यांनी चार पर्याय दिले होते त्यात धनुष्यबाण चिन्हाचे नुकसान, 40 आमदार आणि 12 खासदार गमावणे, दीर्घकाळ निष्ठावंत युतीचा पराभव की कट्टर उजव्या विचारसणीची कडवी हिंदुत्त्ववादी पक्षाची प्रतिमा पुसली जाणे असे म्हणत अमृता यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मात्र, ठाकरेंच्या गोटातून अद्याप त्यावर प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.