देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असे वाटतं का? अमृता फडणवीस म्हणाल्या….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच्या त्यांच्या वक्तव्यावरुन चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी झी मराठी वरील बस बाई बस या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी दिलेली दिलखुलास उत्तरे यामुळे सगळीकडे अमृता फडणवीस यांची चर्चा होते आहे.या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना राजकीय घटनांवर आदारीत अनेक प्रश्न विचारण्यात आले होत. अमृता यांनी ही त्याला दिलखुलास पद्धतीने उत्तरे दिले. अमृता फडणवीस यांना विचारण्यात आले, ‘देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं वाटतं का?’ जेव्हा हा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा त्या थोड्या गोंधळलेल्या पहायला मिळाल्या. त्यानंतर त्यांनी उत्तर दिलं, मला माहिती नाही. ते मुख्यमंत्री होतील, हेच मला कधीही वाटले नव्हते. त्यामुळे पंतप्रधान तर वाटूच शकत नाही.’
पंतप्रधान पद हे असे आहे की त्यावेळी देशाच्या हितासाठी काय चांगले आहे, हे लक्षात ठेवूनच करावे.आतासध्या नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणीही देशासाठी चांगले नाही हे मला समजतंय.पुढे १० ते २० वर्षे गेल्यानंतर त्या पदासाठी कोण पात्र असेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही. त्यामुळे ते पंतप्रधान होतील की नाही हे मला माहिती नाही असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.