एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत ! एकनाथ शिंदे जिंदाबाद – अमृता फडणवीस

एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत. एकनाथ शिंदे जिंदाबाद, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलेआहे. मुलुंड येथे दांडिया कार्यक्रमानिमित्त अमृत फडणवीस आल्या होत्या तेव्हा त्या बोलत होत्या.तिथे गाण्यावर अमृता यांनी ठेकाही धरला.
अमृता फडणवीसांना तुम्ही दसरा मेळाव्यातलं कोणाचं भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारला विचारण्यात आला होता त्यावेळी त्या म्हणाल्या की, पॉलिटिकली आपल्याला प्रत्येक नेत्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं चांगलं असतं. तर मी प्रत्येकाचं, दोघांचं ऐकीन. पण वैयक्तिकरित्या एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत. पण मी दोघांचंही ऐकेन. यानंतर गर्दी कुठे होईल असं विचारलं असता, एकनाथ शिंदे जिंदाबाद अशी घोषणासुद्धा त्यांनी केली.
दसरा मेळावा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट जोरदार तयारी करताना दिसत आहेत. दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार यात शंकाच नाही.