सुप्रसिद्ध गायकासह अमृता फडणवीसांनी गायलं रोमँटिक गाणं, व्हिडीओ पाहिलात का?

मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे ट्विट किंवा वक्तव्य याची चर्चा होतच असते. अमृता बँकेत नोकरी करत असल्या तरी त्यांनी गायिका म्हणून आपली आवड जपलेली आहे. त्यांनी अनेक गाणी गायली असून अल्बम देखील रिलीज झालेले आहेत.आता पुन्हा त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे.
एका चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिलेला आहे. ‘लव्ह यू लोकतंत्र’ या चित्रपटातील एक गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय.‘धडका दिल’ असे त्यांनी गायलेल्या गाण्याचे बोल आहेत. सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक शानसह त्यांनी हे गाणे गायलेले आहे. अमृता फडणवीसांचे हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांनी त्याला पसंत केले आहे. अमृता यांनी इन्स्टावरुन पोस्ट शेअर करत ही माहिती दिलीय.
‘लव्ह यू लोकतंत्र’ चित्रपटातील ‘ना जाने क्यू धडका दिल’ हे या वर्षातील सगळ्यात रोमॅंटिक गाणं लोकप्रिय गायक शान यांच्यासह गाताना मजा आली असे अमृता यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. १४ ऑक्टोबरला ‘लव्ह यू लोकतंत्र’ हा चित्रपट रिलीज होतोय.