केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर विरोधक-सत्ताधारी यांच्या अनेक प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. सोमवारी मध्यरात्री संजय राऊतांना ईडीने अटक केली.राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केले आहे. धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ही राऊतांच्या अटकेवर भाष्य केले आहे. बाळासाहेब ही म्हणाले असतील..शाब्बास संजय !! ना डर, ना सत्तेचा लोभ,ना मला वाचवा अशी भीक मागितली…तो योध्दा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी…! दिल्ली समोर झुकणार नाही! जे घाबरून पळून गेले ते शिवसैनिक असू शकत नाहीत? असे ट्विट केदार दिघे यांनी केले आहे