ठाकरेंच्या उमेदवाराला धनुष्यबाणाशिवाय लढवावी लागणार निवडणूक?

राज्यात कोणाचा आवाज शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा याची लीटमस टेस्ट अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे. पण एकनाथ शिंदेंच्या खेळीने आता ठाकरेंच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे. अंधेरी पूर्व निवडणूक महिनाभरावर आलीये आणि शिंदेंनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे अशा परिस्थिती निवडणूक आयोगाकडून ठाकरेंना तात्पुरत चिन्ह मिळेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वरिष्ठ पत्रकारांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की उद्धव ठाकरेंकडून उत्तर आल्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवेल. कारण निवडणूक जवळ आलेली आहे आणि इतक्या कमी कालावधी या प्रकरणात निर्णय होणं शक्य नाही. गेल्या काही कालावधीत अशी अनेक उदाहरणं पहायला मिळालीत त्यात रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचे उदाहरण आहे त्यामध्ये रामविलास पासवान यांचा मुलगा आणि भाऊ यांच्यात गट पडले होते. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पार्टीमध्ये दोन गट पडले होते.
पुढील निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्हच गोठवून टाकेल. त्यानंतर निवडणूक आयोग दोन्ही गटांना निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय विचारले जातील. मग त्यातून एक चिन्ह ठाकरे आणि शिंदे यांना दिला जाईल. जसं लोक जनशक्ती पक्षाच्या एका गटाला निवडणूक आयोगाने विमान आणि दुसऱ्या गटाला शिलाई मशीन असं निवडणूक चिन्ह दिले होते. अगदी त्याप्रमाणेच या प्रकरणता होवू शकतेय कारण निवडणूक होण्यास एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी आता राहिलेला आहे.